Rotary 3131 - Project Details

19-01-2019 - 19-01-2019

जेव्हा डिजिटल व्यवहार होतील तेव्हाच देशाची प्रगती – डॉ. दिपक करंजीकर पिंपरी, ता. 20 - नोटबंदी नंतर आयकर भरणाऱ्यांची टक्केवारीचे प्रमाण वाढले. भारतात सार्वजनिक आयुष्य खूप वाईट आहे. वैयक्तिक आयुष्य मात्र चांगले जगता येत आहे. आपण जगाचे ग्राहक झालो आहोत.आपल्या देशात तेल आयात करावे लागते. नोटांच्या बाजारात पाय वाट नसते. जेव्हा डिजिटल व्यवहार होतील त्यावेळी देशाची प्रगती होईल, असे मत ज्येष्ठ तज्ञ डॉ. दिपक करंजीकर यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रोटरी क्लब ऑफ चिंचवड यांच्यावतीने शिशिर व्याख्यानमालेच्या तृतीय व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, सी.ए. किशोर गुजर, मानद सचिव बाळकृष्ण खंडागळे, बाळासाहेब माने, प्रसाद गणपुले, सुरेंद्र शर्मा, अरविंद गोडसे, दिपेन समर्थ,प्रवीण गणवारे, सुजीत पाटील, भास्कर गावडे,मननाथ शेट्टी, राजेश अगरवाल, महावीर सत्यायणा, सुनील शिवापुरकर, मधुरा शिवापुरकर, शिल्पागौरी गणपुले आदी उपस्थित होते. यावेळी चाकण येथील प्रोटो डी. इंजिनिअरिंगचे दिपक शिंदे व प्रदीप लोखंडे यांना व्यवसाय नैपुण्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते म्हणाले, पैशाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. पैशावर जग चालते त्यावर उघडपणे बोलले पाहिजे. पैसा प्रवाहित असला पाहिजे त्याच्या गाठी होता कामा नये. लोकशाहीत जास्त धोरणे असल्यास चलन फिरत राहते. नोटबंदी झाली त्यावेळी 100 टक्के पैसे जमा झाले पाहिजे होते. ते होणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले का हा संशोधनाचा विषय आहे. अजूनही भारत देश अजूनही कर्ज घेतो. विकसित देशात 4 ते 6 टक्के व्याजाने कर्ज घेतली जातात भारत मात्र 12 टक्केच्या पुढे कर्ज घेतो. जागतिकीकरण आपण स्वीकारले नाही ते आपल्यावर लादले आहे जागतिकीकरणामुळे ‘राष्ट्रातीत नागरिकत्व’ निर्माण होत आहेजागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून आणि माहिती तंत्रज्ञानाच्या स्फोटातून राष्ट्र-राज्याच्या सीमा अंधुक होऊन राष्ट्रांचे सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे.

Project Details

Start Date 19-01-2019
End Date 19-01-2019
Project Cost 270000
Rotary Volunteer Hours 16
No of direct Beneficiaries 750
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area