भोर मधील सुतार वाडी ह्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प:
प्रांतपाल म्हणुन वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ह्या प्रकल्पाच्या उदघाटनाला जाण्याचा योग आला होता. पुण्या पासुन 30 ते 40 km अंतरावरील ह्या गावात Rotary Club of Pune Westend ने केलेल्या कामाचा आवाका व त्याचा समाज जीवनावर उमटनारा ठसा हा मला प्रत्यक्ष गावात गेल्यावर बघावयास मिळाला.
शासनाच्या लाल फितीत अडकल्या मुळे गेल्या 70 वर्षांत ह्या गावात नळा वाटे पिण्याचे पाणी पोहोचू शकले नव्हते.
मैलभर लांब नदी मधून पाणी आणण्यात गावातील मूलींच्या तीन पिढ्या खांद्या तून वाकल्या होत्या. शिक्षणा अभावी गावातील मुलींची लग्न होत नव्हती, तर बाहेरच्या गावतील मुली लग्न करुन ह्या गावात येण्यास तयार नव्हत्या. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचे एक भीषण वास्तव समोर उभे होते.
Rotary Club of Pune Westend च्या सर्व सभासदां नी भगिरथ प्रयत्न करुन दोन km ची pipeline उभी केली. वाटेत एक विहिर खणून त्यात पाणी साठवले व तेथून गवबहेरील पाण्याच्या टाकित पाणी motor च्या मदतीने चढवले. ह्या सर्व मेहनतिचे फलित म्हणून प्रत्येक घरात नळा वाटे पाणी पोहोचले. पहिल्यांदाच नळा तून आलेले पाणी बघून एका आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकू लागले होते. दोन्ही हात जोडून आजीने रोटरी ला चक्क देव्हारा मधे नेउन बसवले. तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर," ह्या हयातीत कधी घरात नळा तून पाणी येईल असे वाटत नव्हते, ह्या रोटरी च्या देव माणसा मुळेच हे घडू शकले."
शासकीय खर्चाच्या 25% रकमेत हा प्रकल्प (10 लाख फक्त) Rotary Club of Pune Westend ने पुर्ण केला होता. 2015 पासुन पुढील सात वर्षात ह्या टीम ने असे सात प्रकल्प पुर्ण केले आहेत.