Rotary 3131 - Project Details

12-12-2018 - 12-12-2018

राष्ट्रीय नेते मा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त "दृष्टीहिन (अंध ) विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी" यावर आकुर्डीत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी, ता. 12 - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , विदयार्थी कल्याण मंडळ इंग्रजी विभाग, रामकृष्ण मोरे कॉलेज आकुर्डी पुणे व रोटरी क्लब चिंचवड, इनर व्हील क्लब पिंपरी, रोट्रॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत "दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी"या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व दृष्टीहीन विद्यार्थ्यांना रामकृष्ण मोरे कॉलेज आकुर्डी येथे सकाळी ९ ते १ या दरम्यान एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन वाडिया कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. निरज भगत, देहुरोड येथील माई बाल भवनच्या अध्यक्षा प्रतिज्ञा देशपांडे, पिंपळे गुरव येथील ममता अंध आश्रमचे तुषार कांबळे, रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते. भूषण तोष्णीवाल याचे परिश्रम ही यशाची गुरकिल्ली यावर मुलाखत प्रा.डॉ.शिल्पागौरी गणपुले यांनी घेतली. तांत्रिक चर्चासत्रामध्ये भवारी कांकरिया, सतीश नवले, पराग कुंकलोळ,रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे सेक्रेटरी रो. बाळकृष्ण खंडागळे,रो. संजय खानोलकर तसेच रोट्रॅक क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मयुर कलशेट्टी यांचा सहभाग होता.

Project Details

Start Date 12-12-2018
End Date 12-12-2018
Project Cost 75000
Rotary Volunteer Hours 32
No of direct Beneficiaries 700
Partner Clubs Rotract Club of Chinchwad
Non Rotary Partners Inner Wheel club of Pimpri Savitribai Fule Pune Univercity Board of student development and Department of English
Project Category -