Rotary 3131 - Project Details

20-01-2019 - 20-01-2019

वेब सिरीजमुळे व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी वाढल्या - शिवाजी साटम शिशिर व्याख्यानमालेचा समारोप; शिवाजी साटम यांचा कला गौरव तर पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांचा सेवा गौरव पुरस्काराने सन्मान पिंपरी, 21 जानेवारी - वेब सिरीज हा मीडियाचा नवा आविष्कार आहे. यामुळे तांत्रिक, कला, दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक गोष्टीचं स्पेशलायझेशन झाल्याने त्या त्या क्षेत्रात अधिक चांगल्या प्रकारे काम करता येत आहे, असे मत ज्येष्ठ नाट्य, सिने अभिनेते शिवाजी साटम यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ चिंचवड आयोजित 22 वी शिशिर व्याख्यानमाला उत्साहात पार पडली. व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी शिवाजी साटम बोलत होते. रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या वतीने त्यांचा कला गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत आणि वाकड तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांना सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, सचिव बाळकृष्ण खंडागळे, सहसचिव राजन लाखे, संजय खानोलकर, बाबासाहेब माने, प्रसाद गणपुले, सुरेंद्र शर्मा, अरविंद गोडसे, दीपेन समर्थ, प्रवीण गुणवरे, सुजित पाटील, भास्कर गावडे, मन्मथ शेट्टी, राजेश अगरवाल, महावीर सत्याण्णा, सुनील शिवापूरकर, मधुरा शिवापूरकर, शिल्पागौरी गणपुले आदी उपस्थित होते. रो. शिल्पगौरी गणपुले यांनी शिवाजी साटम यांची मुलाखत घेतली. त्यात साटम म्हणाले, "सुरुवातीला 23 वर्ष बँकेची नोकरी आणि अभिनय अशी तारेवरची कसरत केली. वेळेपूर्वी पोहोचून काही नाटकाच्या तालमी बँकेत केल्या आहेत. अभिनय क्षेत्रात येताना आईने सल्ला दिला की अभिनय क्षेत्रात काम कर पण सगळी आर्थिक गणिते सांभाळून. त्यामुळे नोकरीची गरज आणि अभिनयाची आवड दोन्ही उत्तम प्रकारे जोपासली." डॉ. वसंतराव देशपांडे, पंडित चंद्रकांत लिमये, बाळ धुरी, लता मंगेशकर, रजनीकांत, पू ल देशपांडे यांच्यासह अनेक कलाकारांच्या आणि नाटकांच्या आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या.

Project Details

Start Date 20-01-2019
End Date 20-01-2019
Project Cost 310000
Rotary Volunteer Hours 18
No of direct Beneficiaries 950
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area