Rotary 3131 - Project Details

17-12-2018 - 17-12-2018

संयुक्ता दाणी पुरस्कार सोमवार सतरा डिसेंम्बर रोजी आपल्या क्लब मधे " संयुक्ता दाणी संगीत पुरस्कार " हा कार्यक्रम झाला. बारा वर्षांपूर्वी माजी अध्यक्ष श्रीकांत भावे यांनी त्यांच्या अध्यक्षीय वर्षात हा कार्यक्रम सुरू केला. आपल्या संयुक्ता ताई , दुर्देवाने माझ्यासारख्या नवीन सभासदांना त्यांना भेटत आले नाही पण त्यांचा सुरेल आवाज आणि उत्सुक आणि इच्छुक तरुण वर्गाला गाणं शिकवण्याची त्यांची तळमळ ह्याबद्दल मी नेहमी ऐकते. कार्यक्रमाची सुरुवात संयुक्ता ताईंच्या गोड गाण्याच्या ध्वनिमुद्रिकेने झाली . सी डी महाजन यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली. गेल्या दोन रविवारी अनुक्रमे पहिली व दुसरी (अंतिम) फेरी घेतली गेली. त्यातून एकूण चार विद्यार्थी संयुक्ता दाणी संगीत पुरस्कारासाठी पात्र ठरले. पहिल्या फेरीसाठी परीक्षक म्हणून गौरी शिकारपूर , सीमा महाजन आणि मानस वाघ ह्यांनी काम पाहिले तर अंतिम फेरीच्या परीक्षक होत्या निलीमाताई पुराणिक. आलेल्या अनेक मुलांमधून चार पुरस्कारपात्र गायक निवडण्याचे अवघड काम केल्याबद्दल सर्व परीक्षकांचे आभार . सर्वात पहिल्यांदा मंचावर आला आदीत घाटपांडे . त्याने ' माझे माहेर पंढरी ' हा अभंग आपल्या गोड आवाजात गाऊन सगळ्यांची मने जिंकली. नंतर आली सातवीत शिकणारी हसरी अनुश्री अयाचीत . तिने ' घन दाटूनी येतात ' हे गाणं अत्यंत तयारीने सादर केले. हुजूरपागा शाळेत शिकणारी सुरभी जोशी हिने ' कौसल्येचा राम बाई ' हे अनेक अवघड हरकती असणार गाणं सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. मग ईशान मोडक याने ' जेव्हा तुझ्या बटाना' सादर केलं . ईशान ची छोटीशी मूर्ती आणि त्याने सहज गायलेलं अवघड गाणं , टाळ्यांचा कडकडाट मिळवून गेलं . सीमा महाजन ने कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले तर मानस वाघ यांनी आभार मानले. सर्व छोट्या सुरवीरांना विनुभाऊ आणि आर्टी सरांच्या हस्ते चांदीचे पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. आणि एक सुरेख सुरेल मैफिलीची सांगता झाली

Project Details

Start Date 17-12-2018
End Date 17-12-2018
Project Cost 10000
Rotary Volunteer Hours 50
No of direct Beneficiaries 4
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area, Others