Rotary 3131 - Project Details

03-08-2019 - 03-09-2019

दरवर्षी प्रमाणे दि. 3 ऑगस्ट शनिवारी नागपंचमीच्या पूर्वसंध्येला Ann शिल्पा च्या घरी मेंदीचा खूपछानकार्यक्रम झाला. दुपारी ४:३०ला Anns जमायला सुरुवात झाली. प्रत्येकीने आपापल्या हौसेप्रमाणे व पेशंसनुसार अरेबिक किंवा पारंपारिक पद्धतीने मेंदी काढून घेतली. त्याबरोबर गप्पाही चांगल्याच रंगत होत्या. श्रावणातील ढगाळ हवा, रिमझिम पाउस आणि शिल्पाने सजवलेले फुलापानांचे घर यामुळे निसर्गाच्या सानिध्यातच आहोत असेच वातावरण तयार केले होते. एका वेगळ्या प्रकारच्या छत्रीवर फुलांच्या माळांचे डेकोरेशन केले होते. एकूण २८ Anns आल्या होत्या. मेंदी बरोबर कारओके वर सीमा , शिल्पा , गौरी , ऋजुता आणि बऱ्याच जणींनी छान गाणी म्हटली. अश्विनी आणि शिल्पाने भरपूर फोटो काढले. त्याच्या जोडीला गौरीच्या अपुर्वानेही सुंदर फोटो काढले. मेंदी,गाणी या बरोबर सीमाने उत्तम आणि सुटसुटीत असा फेलोशिपचा मेनू ठेवला होता. बटाटे वडे, चटणी, ओल्या नारळाची करंजी आणि गरमागरम वाफाळलेली कॉफी असा मस्त बेत होता. सीमाची तारा आणि अंजलीची रुहिका आल्यामुळे मजा आली. श्रावणातील फुटण्याचा पण आनंद मिळाला. अंजली आणि शिल्पा ने अतिशय सुंदर भेटवस्तू दिली जी सगळयाजणींना खूप आवडली. रंगलेल्या हातांनी, भरलेल्या पोटांनी आणि तृप्त मनाने सर्वजणी आपापल्या घरी गेल्या . - Ann जयश्री नवाथे

Project Details

Start Date 03-08-2019
End Date 03-09-2019
Project Cost 600
Rotary Volunteer Hours 75
No of direct Beneficiaries 2
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others