Rotary 3131 - Project Details

11-08-2019 - 11-08-2019

“Purpose of Youth Seminar” हा महत्वाचा विषय डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन रो. वीणा रायकर यांनी विस्तृतपणे सांगितला. आजची युवा पीढी आणि रोटरी यामधील Service Above Self यामधून एकमेकांशी दुवा साधला जातो. रोटरॅक्टर हें आपले उत्तम व्यक्ती म्हणून समाजात त्याचे स्थान असेल ( बेटर सिटीझन). आणखीन एक विचार आज जे इंटरॅक्ट मेंबर आहेत ते आपले रोटरॅक्ट मेंबर होतील आणि नंतर रोटेरियन होतील अशी साखळी जर क्लब तयार करू शकले तर खरंच समाजात उत्तम नागरिक तयार होतील, अर्थातच हे रोटरीच्या सहभागामुळेच . रोटरी युथ लिडरशिप बद्दलचे अनुभव रोटरी डिस्ट्रिक्ट युथ टिम ने शेअर केले . चेअर पर्सन रो. पल्लवी साळवी हिने रोटरॅक्ट क्लब बद्दल सविस्तर माहिती दिली. ९५ रोटरॅक्ट क्लब ३१३१ डिस्ट्रिक्ट मध्ये आहेत असे सांगितले. रोटरॅक्ट मधील प्रोजेक्ट फेस बुक पेज व युथ डिस्ट्रिक्ट ला अपलोड करावे असे आवर्जून सांगितले . १६ सप्टेंबर ला, डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स इंटरॅक्ट साठी आयोजन केले आहे. निगडी क्लबच्या रोटरॅक्ट स्टुडंट्सनी सोशल मीडिया अँड व्हायोलन्स या विषयावर पथनाट्य सादर केले . पीडीजी दिपक शिकारपूर यांनी आयटी क्षेत्रातील संभाव्य परिस्थिती या बद्दल विशेष माहिती दिली. आयटी क्षेत्रांत मोठया पगाराचा नोकऱ्या आता नसतील परंतु इतर क्षेत्रांत नोकऱ्या असतील. लाईफ इन २०२३ आणि आयटी याबद्दल माहिती दिली. अनघा मोडक हिचे ‘ बोलू कैसे बोले ‘ यांवर अप्रतिम आणि दर्जेदार भाषेमध्ये भाषण झाले. लहान मुलांसाठी लागणारी बोली भाषा कशी असावी लांबून आई - वडिलांसाठि लागणारा संवाद . आजी - आजोबा साठी वापरली जाणारी भाषा याबद्दल भरभरून सांगितले. संत तुकारामाच्या अभंगांमधून बोली भाषेबद्दल दिलेल्या ओवींचे वर्णन सुंदर केले आजचा जगात या सर्व बोली भाषा बदलत चालल्या आहे त्यासाठि वाचनाची गरज आहे असा मोलाचा सल्ला युवकांना दिला तो देखील विनोदी शैलीने . RYLA, RYE .NGSE यांवर प्रेझेंटेशन झाले एकंदरीत हा सेमिनार मार्गदर्शक ठरला -प्रे अंजली रावेतकर

Project Details

Start Date 11-08-2019
End Date 11-08-2019
Project Cost 2400
Rotary Volunteer Hours 24
No of direct Beneficiaries 70
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category District Thrust Area