Rotary 3131 - Project Details

06-08-2013 - 06-08-2013

‘व्यावसायिक प्रशिक्षण’ या प्रकल्पांतर्गत आपटे प्रशालेत मूकबधीर विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांचे प्रशिक्षण देत आहोत. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून आपण आज या विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तूंपासून वेगवेगळ्या हस्तकौशल्याच्या शोभा-वस्तू तयार करण्यास प्रशिक्षित केले. आर्किटेक्ट वैशाली चौधरी यांनी ही संकल्पना मांडली होती. गृहसजावट करताना अनेक टाकाऊ वस्तू तयार होतात. त्यात टाईल्स, लाकूड, लोखंड, कागद, रंग अशा अनेक वस्तू असतात. त्या टाकून देण्यापेक्षा आपण त्यातून काही शोभेच्या वस्तू तयार करू शकलो तर त्यांचा सदुपयोग होईल तसेच करणाऱ्या व्यक्तींना काही अर्थार्जन होईल अशी संकल्पना त्यांच्या मनात आली. रो. वृंदा व किरण यांनी ही कल्पना उचलून धरली. त्यातून कच्चा माल पुरवण्याचे व तयार झालेल्या वस्तू विकत घेण्याचे आश्वासनही वैशालीने दिले. मूकबधीर विद्यार्थ्यांना ही संधी दिल्यास ते तिचे चीज करतील असा विश्वास आम्हा सर्वांना वाटला आणि त्यातून हा उपक्रम संपन्न झाला.

Project Details

Start Date 06-08-2013
End Date 06-08-2013
Project Cost 0
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 0
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category -