Rotary 3131 - Project Details

11-11-2019 - 11-11-2019

*महाड रोटरी क्लब* तर्फे ग्रामीण भागातील शाळांना हँड वॉशिंग स्टेशन्स देण्यात येणार* महाड रोटरी क्लब तर्फे ग्रामीण भागातील शाळांना 5 हॅन्ड वॉशिंग स्टेशन्स देण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या शाळांना हॅन्ड वॉश स्टेशन्स देण्यात येणार आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि रोटरी क्लब इंटरनॅशनल चे चेअरमन शेखर मेहता यांच्या हस्ते सदर पाच हांडवॉच स्टेशन्स महाड रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री राजेंद्र मेहता तसेच सचिव संतोष नगरकर आणि खजीनदार द्वारकानाथ गुरव यांच्याकडे रोटरी क्लब ऑफ आकुर्डी यांच्याकडून सुपूर्द करण्यात आली आहेत. यासाठी कांबळे, महाड चे शाळा केंद्रप्रमुख रोटेरियन सुधीर मांडवकर यांनी चांगले प्रयत्न करून ग्रामीण भागातील शाळांना लाभ देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. रायगड जिल्हा परिषद अंतर्गत कुर्ला, वहूर, लोणेरे तसेच कांबळे येथील मराठी आणि उर्दू शाळा यांना सदर स्टेशन्स आकुर्डी येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष *जीग्नेश अगरवाल* यांच्या हस्ते देण्यात आली आहेत. सदर हॅन्ड वॉशिंग स्टेशन मुळे शाळेतील मुलांना शारीरिक स्वच्छता राखण्यासाठी खूप मदत होणार आहे. तसेच जेवणा अगोदर व नंतर हात धुण्याची चांगली सोय करण्यात आली आहे. रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र मेहता यांनी शाळांना सांगितले की शाळेत विद्यार्थी खेळल्यानंतर हात धुण्याची व्यवस्था नसल्याने हात धुतले जात नाहीत त्यामुळे हातावरील जंतू शरीरात जातात व त्यामुळे विद्यार्थी आजारी पडतात त्याकरता रोटरी क्लब तर्फे हांड वॉच स्टेशन्स दिले जाणार आहेत. रोटरीचा हा सर्वात चांगला प्रकल्प आहे यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी रोटरी क्लबचे आभार मानून सदर व्यवस्था केल्यामुळे समाधान व्यक्त केले. तसेच अजून काही शाळांना हॅन्ड वॉश स्टेशन्स हवे असतील तर त्यांनी केंद्रप्रमुख रोटे. मांडवकर सर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Project Details

Start Date 11-11-2019
End Date 11-11-2019
Project Cost 37500
Rotary Volunteer Hours 36
No of direct Beneficiaries 600
Partner Clubs RC Akurdi
Non Rotary Partners रा.जी.प. शाळा कांबळे उर्दु, मराठी, कुर्ला, वहूर आणि लोणेरे
Project Category Water and sanitation