Rotary 3131 - Project Details

29-01-2020 - 29-01-2020

29 जानेवारी 2020 रोजी रोटरी क्लब ऑफ महाड तर्फे आयोजित संक्रांती निमित्त प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या जगणे सुंदर आहे या व्याख्यानं द्वारे महाडवासीयांनी विचारांचे वाण लुटले. विरेश्वर मंदिर हॉल येथे झालेल्या जाहीर व्याख्यानास महाड वासियां कडून उदंड प्रतिसाद मिळाला. सदर समाज प्रबोधनात्मक व्याख्यानाचे पूर्ण नियोजन महाड रोटरी महिला यांनी सुंदर रीतीने केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सपना प्रदीप शेठ, प्रास्ताविक आणि महाड रोटरी क्लब विषयी माहिती सौ. जयश्री राजेंद्र मेहता तसेच प्रमुख पाहुणे यांचा परिचय सौ अनघा अमोल महामुणकर आणि आभार प्रदर्शन सौ ज्योती द्वारकानाथ गुरव यांनी सुंदरपणे सादर केले त्याविषयी प्रशांत देशमुख यांनी त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी महाड, लोणेरे, गोरेगाव, माणगाव येथील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, को.म.सा.प. तसेच रोटरीचे विविध पदाधिकारी, विविध वर्तमान पत्राचे वार्ताहर आणि रोटरी सभासद हजर होते, तसेच माननीय प्रशांत देशमुख यांनी "जगणे सुंदर आहे-वाण विचारांचे" या व्याख्यानात सांगितलेल्या पाच सूत्रांचा लाभ अधिक चांगल्या जगण्यासाठी महाड करांना मिळेल आणि पुढचा समाजाच्या आरोग्यविषयक कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल असे रोटरी अध्यक्ष श्री राजेंद्र मेहता यांनी कळविले आहे.

Project Details

Start Date 29-01-2020
End Date 29-01-2020
Project Cost 59000
Rotary Volunteer Hours 36
No of direct Beneficiaries 900
Partner Clubs No
Non Rotary Partners No
Project Category Peace and conflict prevention/resolution