Rotary 3131 - Project Details

25-09-2020 - 24-10-2020

आपणांस प्लाझ्मा हवाय? नमस्कार, कोविड च्या ह्या साथीच्या काळात , plasma therapy हा एक मोठा पर्याय कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी उपलब्ध आहे. रोज परिचित लोकांचे अनेक मेसेजेस प्लाझ्मा पाहिजे ह्यसाठी येतात, अनेक मेसेज नुसते फॉरवर्ड होत राहतात...आणि रुग्णांच्या नातेवाईकांना plasma मिळवण्यासाठी खूप धावपळ करावी लागत आहे. ही धावपळ टाळण्यासाठी "सांगाती" या डॉक्टरांच्या संस्थेच्या पुढाकाराने डॉ.सुजित निलेगावकर व श्री अमित तेली ह्यांच्या प्रयत्नांनी आपण एक software तयार केले आहे. Google forms च्या द्वारे माहिती मिळवून, तिचे संकलन करून, गरजू रुग्णांना वेळीच plasma donor शी जोडून देऊन , रुग्णाच्या उपचारात जीवनदायी असा plasma उपलब्ध करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न! तुमची बहुमूल्य माहिती ही कोणाशीही share केली जाणार नाही. इच्छुक plasma donor ना request आल्यानंतर , sms पाठवला जाईल आणि रुग्णाची माहिती दिली जाईल. त्यानंतर रुग्णाला plasma donation करायचे की नाही हा donor च्या इच्छेचा प्रश्न आहे. अपेक्षा आहे की हा फॉर्म जास्तीत जास्त कोविड मधून बरे झालेले रुग्ण भरतील , आणि दुसऱ्या गरजू रुग्णाला बरे होण्यासाठी मदतीचा हात देतील ! जास्तीस्त जास्त डोनार रजिस्टर झाले तर अनेकांचे प्राण वाचतील तेव्हा आपल्या परिचित कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींना खालील लिंकवर तुम्ही रजिस्टर करायला सांगु शकता. https://bd.supanth.org/blood-donation/register तसेच कोणास plasma हवा असेल त्यास खालील लिंक वर रजिस्टर होण्यास सांगा https://bd.supanth.org/blood-donation/register-patient नक्कीच तुम्ही ह्या नोंदणी अभियानास सहकार्य कराल! धन्यवाद रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी

Project Details

Start Date 25-09-2020
End Date 24-10-2020
Project Cost
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 0
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area, Disease prevention and treatment, District Thrust Area