Rotary 3131 - Project Details

23-10-2020 - 23-10-2020

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जागर आदिशक्तीचा... सन्मान कर्तृत्ववान स्त्री शक्तीचा... सातवी माळ पुष्प सातवे :- सौ.आदिती देवधर - संस्थापक - जीवित नदी विषय :- घरगुती कंपोस्ट करण्याचे तंत्र..!! सौ. अदिती देवधर या पर्यावरणवादी असून पुण्यातल्या नदींवर बरीच वर्षे काम करणारी संस्था जीवितनदी या संस्थेच्या संस्थापक आहेत, #ब्राऊन_लीफ या समूहाच्या माध्यमातून पडलेला पालापाचोळा, झाडांची पाने, घरगुती कचरा या पासून सहजरित्या घरच्या घरी कंपोस्ट खत कसे करावे या बाबत त्यांना प्रदीर्घ अनुभव असून विविध संस्थांना आणि समूहांना त्या मार्गदर्शन करतात, या मध्ये आपल्या घरातूनच नदीचे प्रदूषण कसे रोखता येईल याबाबत त्यांनी अभ्यासपूर्वक मत मांडले असून आपल्या जीवनदायिनी नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी घरातील कचरा घरच्या घरी जिरवून कंपोस्ट कसे करता येईल या साध्या सोप्या भाषेतील तंत्र त्यांनी सांगितले आहे, नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जागर आदिशक्तीचा करत सातवी माळ गुंफताना ऐकून घेऊ या त्यांचे मनोगत !! भेटूया आज संध्याकाळी ६ वाजता रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी फेसबुक पेज व यु ट्यूब चॅनेलवर !! फेसबुक पेज :- https://www.facebook.com/rotaryclubofwalhekarwadi/ युट्युब :- https://www.youtube.com/results…

Project Details

Start Date 23-10-2020
End Date 23-10-2020
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 12
No of direct Beneficiaries 2000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy, Club Thrust Area, Environment Protection