Rotary 3131 - Project Details

18-12-2020 - 18-12-2020

रोटरी क्लब आॕफ तळेगांव दाभाडेच्या डिजिटल स्कुल मोहीमे अंतर्गत ९ शाळांमध्ये १२ ई-लर्निग सेटचे अनावरण. --- अॕप्टीव्ह कांम्पोनंटस् ( इं ) प्रा. लि. चाकण, रोटरी क्लब आॕफ त.दा. आणि रोटरि पुणे पाषाण यांच्या संयुक्त विद्यमाने अॕप्टीव्ह कंपनीच्या CSR फंडातुन उपलब्ध झालेल्या रु.९ लाख फक्त यातुन त.दा.न.प. माध्यमिक शाळा क्र.६ , गुलाबी शाळा, तळेगांव स्टे. येथे डिजीटल स्कुल मोहीमे अंतर्गत, ९ वी व १० वी साठी ई-लर्नीग सेटचे अनावरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दि. १८.१२.२०२० रोजी सकाळी ११ वाजता मा.रो.आमदार सुनिलजी शेळके यांचे बंधु मा. रो. सुधाकरजी शेळके यांच्या शुभ हस्ते करण्यात संपन्न झाला. प्रसंगी मा.श्री गणेशजी खांडगे, सभापती, तदानप शिक्षण समिती, तसेच अॕप्टीव्ह कंपनीचे एच आर प्रमुख मा. श्री आशिषजी त्रिभुवन, रो. यादवेंद्रजी खळदे, अध्यक्ष रो. राहुल दांडेकर, रो. महेश महाजन, रो. बाळासाहेब चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आमदार रो. श्री सुनिलजी शेळके यांच्या डिजीटल स्कुल या संकल्पने अंतर्गत रोटरी क्लब तळेगाव दाभाडे चांगले कार्य करीत आहे, यासाठी समाधान व्यक्त केले. तसेच या प्रकल्पांचे प्रमुख रो. महेशजी महाजन व प्रकल्प समन्वयक रो. बाळासाहेब चव्हाण यांचे या प्रकल्पासाठी आभिनंदन व कौतुक केले. रो. यादवेंद्र खळदे यांनी अॕप्टीव्ह कंपनीचे आभार माणतानाच मावळ तालुक्यातील दुर्गम शाळाना प्राधान्य देऊन येथील गरीब विद्यार्थी-विद्यार्थीनींना भविष्यात शैक्षणीय सुविधा द्याव्यात, व तशी गरजही आहे, अशी इच्छा व्यक्त केली. या प्रसंगी रोटरीचे पदाधिकारी रो. विश्वनाथ मराठे, प्रभाकर निकम, डाॕ. सुर्यकांत पुणे, श्रीशैल मेंन्थे, जनार्दन ढम, अरुण बारटक्के, भालचंद्र लेले, विलास जाधव इ. उपस्थित होते. या डिजीटल स्कुल मोहीमेअंतर्गत एकुण ९ शाळांमध्ये मार्च २०२० पर्यत एकुण १२, ई- लर्निग सेट बसविण्यात येत आहेत. यात मावळ तालुक्यात तदानप माध्यमिक शाळा क्र.६, गुलाबी शाळा तळेगांव स्टे. येथे दोन, जि.प. शाळा सुदुम्ब्रे येथे दोन, खेड तालुक्यात निमगाव खंडोबा येथे जि.प. शाळांमध्ये चार व शिवे येथे जि.प. शाळांमध्ये चार, असे एकुण १२ सेट उभारण्यात येणार आहेत. या सेटमध्ये सॕमसंगचा ४९ इंची स्मार्ट टीव्ही, उत्कृष्ट एज्युकेशन साॕफ्टवेअर, तसेच ट्राॕलीबेस साऊंडसिस्टीम जी वर्गात तसेच मैदानावरही वापरता येणार आहे. एकुण प्रत्येक सेटची किंमत रु.६५ हजार इतकी आहे. कार्यक्रमाचे सुरेख आखणी व सुत्रसंचलन मुख्याध्यापक मा.श्री. आमोल पाटीलसर व सौ. सुरेखा जाधव यांनी केले. प्रसंगी शिक्षक वृंद सौ. प्रियंका हातेकर, प्रतिभा काळे, दिपमाला गायकवाड,आशा खुणे व श्री दत्तात्रय कोकाटे यांनी हा सोहळा यशस्वी व्हावा यासाठी अथक प्रयत्न केले या लोकार्पण सोहळ्याची सांगता अध्यक्ष रो. राहुल दांडेकर यांच्या उपस्थितांच्या आभार प्रदर्शनाने झाली. Aptive Components Pvt Ltd Chakan यांचे CSR फंडातून मागील वर्षी दोन शाळा मधे टाॅयलेट व 9 शाळांमधे 12 E learning kits असा प्रोजेक्ट नियोजित होता. पैकी एक टाॅयलेट फेब 2020 मधे पूर्ण झाले व बाकी प्रोजेक्ट कोव्हिड लाॅकडाऊन मुळे अपुर्ण राहिले. हे प्रोजेक्ट Mar 2020 पुर्वीच पुर्ण करायचे होते, परंतू आता कंपनी ने ते या वर्षांत लवकरात लवकर पूर्ण करणेस परवानगी दिलि आहे. या विषयावर अध्यक्ष व सेक्रेटरी याना सर्व अपडेट दिले आहेतच. पाच शाळा व एक टाॅयलेट यावर बाळासाहेब चव्हाण प्रोजेक्ट लिडर म्हणून लीड करतील तर मी स्वतः चार शाळांमधील e learning साठि प्रोजेक्ट लीडर म्हणून लीड करेन. फंड RC Pashan द्वारे रूट केले जातील. शाळांचा तपशील खालील प्रमाणे. ई लर्निग सेटस् ( टीव्ही + साऊंड सिस्टीम + एज्युकेशन साॕफ्टवेअ+ एन्ड्राॕईड बाॕक्स अंदाजे 70k per kit) शाळांची नावे.+ ईयत्ता + = सेटस् १) गुलाबी शाळा तळेगाव स्टे. ९वी व १० वी = २ सेटस् २) जि. प. शाळा सुदुंबरे + ६वी व ७वी = २ सेटस् ३) ज्ञानदिप शाळा शिवे +९वी व १०वी = २ सेटस् ४) जि. प. शाळा शिवे + ७वी = १ सेट ५) जि.प. शाळा वाकी + ४थी = १सेट ६) जि.प. शाळा निमगांव रामनगर + ७वी = १सेट ७) जि प शाळा चिंचोशी + ७वी = १सेट ८) जि.प. शाळा व्होयाळी + ७वी = १ सेट ९) जि प शाळा वाकळवाडी + ७ वी = १ सेट एकूण ९ शाळा = १२ सेटस् एकूण मंजुर ९ लाख CSR

Project Details

Start Date 18-12-2020
End Date 18-12-2020
Project Cost 900000
Rotary Volunteer Hours 300
No of direct Beneficiaries 720
Partner Clubs
Non Rotary Partners Active Components India Pvt. Ltd
Project Category Basic education and literacy