Rotary 3131 - Project Details

20-06-2021 - 20-06-2021

नमस्कार, आज दिनांक 20 जून 2021 रोजी ब्रेक टेस्ट ट्रॅक दिवे, सासवड येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला, सदर कार्यक्रमास देवराई फाऊंडेशनचे चीफ ट्रस्टी श्री रघुनाथ ढोले साहेब व कृषी अधिकारी श्री झेंडे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी वर्ग आणि आणि पुणे बस ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी व सभासद तसेच रोटरी क्लब पुणे मिड ईस्ट चे मेंबर्स उपस्थित होते आज ठरल्याप्रमाणे ठीक सकाळी दहा वाजता वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुरुवात झाली व या ठिकाणी जवळपास दोन हजार देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले यामध्ये पिंपळ, कदंब, वड, कडूनिंब, कांचन, जांभूळ, सप्तपर्णी, बहावा, पळस, ताम्हण, व पिचकारी अशा विविध प्रकारच्या देशी वृक्षांचा समावेश होता. यामुळे येथे दररोज येणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण येणार आहे, तसेच येथे येणाऱ्या शेकडो ड्रायव्हर्स ला उन्हामुळे होणारा त्रास कमी होणार आहे, विषेश उपस्थिती आदरणीय श्री प्रसन्न पटवर्धन साहेब. आदरणीय श्री प्रकाश शेठ गवळी साहेब. आदरणीय श्री जुबिन साहेब. MBMS इतर सभासद. सर्वांचेच मनःपूर्वक आभार व खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. राजन जुनवणे ,तुषार जगताप, किरण देसाई व सर्व पदाधिकारी व सभासद. आणि सर्व रोटरी परिवार

Project Details

Start Date 20-06-2021
End Date 20-06-2021
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 6
No of direct Beneficiaries 50
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Environment Protection