Rotary 3131 - Project Details

03-04-2021 - 12-04-2021

#Mission #vacsination #PCMC उदया महापालिकेने शहरात 25000 लोकांचे लसीकरण करण्याचे टार्गेट ठेवले आहे, आपल्या वाल्हेकरवाडी केंद्रात 500 लोकांचे उद्धिष्ट आहे. मिशन 25000 यासंदर्भात आज पालिका मुख्यलयात आरोग्य प्रमुख यांच्याशी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लसीकरणाचे उद्धिष्ट पूर्ण करण्यास काय करता येऊ शकते ह्या संदर्भात चर्चा करण्यात आली. आपण सर्वांनी जास्तीत जास्त लोकांना रजिस्टर करून केंद्रापर्यंत आणण्याचे नियोजन केल्यास नक्कीच आपल्या विभागाचे उद्धिष्ट पूर्ण होईल. मिशन लसीकरण - वाल्हेकरवाडी ✅ मराठी शाळा वाल्हेकरवाडी येथे मोफत कोविड १९ लसीकरण केंद्र चालू झाले आहे. ✅ लस पूर्णपणे सुरक्षित आहे, तरी परिसरातील ४५ वयाच्या पुढील सर्व नागरिकांनी लस घ्यावी. ✅ ही लस मोफत देण्यात येणार आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. ✅ लस नोंदणी आपण https://selfregistration.cowin.gov.in वेबसाईट वर आधार कार्ड च्या साह्याने करु शकता. ✅ नोंदणी करताना आपण जो मोबाईल क्रमांक वापरला आहे तो नंबर लसीकरण केंद्रात दयावा. ✅ स्थळ :- पि. चि. मनपा. शाळा वाल्हेकरवाडी, चिंचवड पुणे-33 ✅ टीप :- प्राथमिक तपासणी करीता येताना सोबत ओळखपत्र अथवा आधारकार्ड आणावे. ✅ तोंडावर मास्क असल्याशिवाय लसीकरण केंद्रात प्रवेश मिळणार नाही. ✅ नोंदणी करण्यास आपणास काही अडचण असल्यास आपण आम्हास संपर्क करू शकता. धन्यवाद रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी

Project Details

Start Date 03-04-2021
End Date 12-04-2021
Project Cost 500
Rotary Volunteer Hours 18
No of direct Beneficiaries 500
Partner Clubs
Non Rotary Partners PIMPRI CHINCHWAD MUNICIPAL CORPORATION, PIMRI
Project Category Club Thrust Area, Disease prevention and treatment, District Thrust Area, Peace and conflict prevention/resolution