Rotary 3131 - Project Details

20-09-2020 - 20-09-2020

रोटरी क्लब राजगुरूनगर डिस्ट्रिक्ट 3131 कडून कोहिनकरवाडी येथे 100 महिलांना मोफत बियाणे वाटप रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरच्या happy village प्रकल्पाअंतर्गत कोहिनकर वाडी येथे परसबाग प्रशिक्षण व 100 महिलांना 13 प्रकारचे बियाणे वाटप करण्यात आले व ग्रामपंचायत कोहिनकर वाडी च्या वतीने मास्क वाटप करण्यात आले . पर्याय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. वामन बाजारे यांनी परसबाग म्हणजे काय, त्याची लागवड करण्याची पद्धत, व वाटप केलेल्या बियाण्याचे आपल्या दैनंदिन आरोग्या साठी होणारे फायदे या विषयी मार्गदर्शन केले. रोटरी क्लब चे अध्यक्ष रो. राहुल वाळुंज यांनी सांगितले कोहिनकर वाडी गाव हे आम्ही happy village या प्रोजेक्ट साठी निवडले आहे त्यामुळे वर्षभर नवनवीन प्रोजेक्ट येथे केले जाणार आहे. प्रसंगी मा. सेक्रेटरी सुधीर येवले, संदीप उबाळे, नागेश कोहिनकर यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रकल्प प्रमुख अविनाश कोहिनकर यांनी सांगितले की वर्षभर कमीत कमी 100 गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे. सरपंच वैशालीताई कोहिनकर यांनी प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आणि रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगर व पर्याय प्रतिष्ठान या दोन्हीही संस्थांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्तविक रो. अविनाश कोहिनकर यांनी केले व आभार उपसरपंच कौशल्या कोहिनकर यांनी मानले.

Project Details

Start Date 20-09-2020
End Date 20-09-2020
Project Cost 20000
Rotary Volunteer Hours 60
No of direct Beneficiaries 650
Partner Clubs
Non Rotary Partners kohinkar commerce foundation
Project Category Water and sanitation