Rotary 3131 - Project Details

25-04-2016 - 26-06-2016

RCPS ची कालची मीटिंग म्हणजे "आऊटडोअर गाइडेड टूर" होती... अनेक सभासदांनी ह्या टूर ला हजेरी लावली आणि एक छोटीशी पिकनिकच झाली... टूर होती " एम्प्रेस गार्डन"ला... एम्प्रेस गार्डन ची स्थापना सन १८२७ मध्ये झाली.. पुणे शहरापासून थोडं लांब रेसकोर्स च्या समोर ४० एकर जागेत ही अवाढव्य बाग पसरलेली आहे. उंचच उंच झाडं, चित्र विचित्र,कधी फारशी ऐकिवात नसलेली ही झाडं अनेक वर्षं या बागेत तग धरून उभी आहेत... सर्व झाडांना १००/१००,२००/२०० आणि त्याहून जास्त आयुष्य आहेत...मोहाची झाडं, शिरीष(Rain Tree), गोरख चिंच, महाधवडा, कारंजाची झाडे, अशोकाची झाडे, उंदीर मारी.....अशी अनेक अनेक..... बागेतील सर्व झाडांची माहिती तिथल्याच एका गाईड ने आम्हाला दिली आणि त्यांचे आयुष्य, त्यांचे औषधी उपयोग, फुले, फळे कशी येतात, पाणी किती द्यावे लागते इत्यादी अत्यंत उपयुक्त माहिती देऊन आमच्या dhnyanat भर घातली..२ तास फेरफटका मारूनही बाग काही संपत नव्हती यावरून बागेच्या विस्ताराची कल्पना आली असेलच....

Project Details

Start Date 25-04-2016
End Date 26-06-2016
Project Cost 2500
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 40
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others