Rotary 3131 - Project Details

24-01-2016 - 24-01-2016

शास्त्रीय संगीत कार्य शाळा किंवा Music Appreciation Workshop ही RCPS ने आयोजित केलेली कार्य शाळा संगीत विषयाचा कान असणार्या न्साठी एक पर्वणीच ठरली.शास्त्रीय संगीत गायक आणि RCPS चे मानद सभासद श्री पुष्कर लेले यांनी अतिशय सहज सोप्या भाषेत , द्रुक-श्राव्य माध्यमातून शास्त्रीय संगीताची ओळख करून दिली. No Music No Life - Know Music Know Life असं कुठे तरी वाचलय... अगदी हीच अनुभूति आज आम्हां सर्वांना आली.पुष्कर लेले यांनी काही प्राथमिक प्रश्न विचारून , काही ऑडियो तसेच काही व्हिजुअल्स दाखवून प्रेक्षकांना बोलते केले..शास्त्रीय संगीताचा उगम, इतिहास ,राग कसे तयार होतात, आरोह-अवरोह , मन्द्र-मध्य-तार सप्तक,तसेच टप्पा ,ठुमरी,तराणा,बंदिश,ध्रुपद गायकी,खयाल गायकी ई ई अनेक सामान्य लोकांनी कधी तरी कुठे तरी वाचलेल्या पण नक्की काय ते अवगत नसलेल्या शब्दांची पक्की माहिती दिली इतकेच नव्हे तर ती समजावून सांगताना आमच्या कडून स्वर पक्के होण्या साठी आणि नक्की काय ते समजण्या साठी ते म्हणवुन पण घेतले.शास्त्रीय संगीत वाटते तितके सोपे नाही पण शिकायला काय हरकत आहे?? असेच सर्वांनी मनाशी ठरवले हे नक्की.जाता जाता " चांगला श्रोता होण्यासाठी काय अवश्यक आहे हे सांगायला ते विसरले नाहित... आजचा हा कार्यक्रम खूपच रंगला आणि सर्वांसाठी खुला असल्या मुळे अनेक जणांनी या कार्य क्रमाचा आस्वाद घेतला...!!!

Project Details

Start Date 24-01-2016
End Date 24-01-2016
Project Cost 20000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 50
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others