Rotary 3131 - Project Details

28-08-2011 - 28-08-2011

'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा' पदयात्रेत गांधीभवन क्लबचा आवाज दुमदुमला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या पाच दिवसांच्या 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा' या जागृती निर्मितीसाठीच्या पदयात्रेत आपल्या क्लबने भाग घेतला होता. आपल्या समाजातील मुलींचे घटत जाणारे प्रमाण हा चिंतेचा विषय आहे आणि ते प्रमाण वाढवण्यासाठी जोमाने प्रयत्न करणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन आपल्या क्लबने या वर्षी विविध उपक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे. पदयात्रेतील सहभाग हा त्यातील एक उत्साहवर्धक प्रयत्न ठरला. रविवार दि. २८ ऑगस्ट रोजी आपल्या क्लबमधील ३५ सदस्य आणि कुटुंबीय सकाळी ९ वाजता कर्वे पुतळ्यापाशी जमले होते. त्यावेळी पाऊस पडत असूनही कुणाचाही उत्साह कमी झाला नाही हे विशेष. लवकरच सुर्यादत्त संस्थेतल्या आपल्या rotaract क्लबचे पन्नासेक rotaractors हातात फलक घेऊन तिथे येउन पोचले आणि वातावरणात आणखी जोश निर्माण झाला. एजी उज्ज्वल मराठे, नियोजित प्रांतपाल दीपक शिकारपूर यांच्या पत्नी रो. गौरी शिकारपूर, सुर्यादात्ताचे संचालक संजय चोरडिया, प्रा. विवेक सेठिया, नगरसेवक शाम देशपांडे, बाबा धुमाळ, विनायक लांबे, विविध पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे किती महत्व सगळ्यांना वाटत आहे ते सिद्ध झाले. या सर्व मान्यवरांनी महर्षी अण्णा कर्वे यांच्या पुतळ्याला हार घालून त्यांना अभिवादन केले. मुलींच्या उन्नतीसाठी कर्व्यांनी, महात्मा फुल्यांनी केलेल्या प्रयत्नांचे सतत स्मरण ठेवले तर असे काम करायला बळ मिळते असे उपस्थितांनी सांगितले व गांधीभवन क्लबचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. त्यानंतर आपल्या तरुण मित्रांनी अतिशय मनोरंजक पण उद्बोधक पथनाट्य सदर केले. रस्त्यावरील अनेकांनी मुद्दाम थांबून ते पाहिले. त्यानंतर विविध घोषणा देउन कार्यक्रम संपला. आपल्या क्लबने तयार केलेले वैशिष्ट्यपूर्ण फलक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. त्यावरील ओळीही तितक्याच वेधक आणि परिणामकारक होत्या. त्यानंतर सर्व जण शानिवारवाड्याला गेले. तेथील वातावरण पाहून सगळ्यांच्या अंगात नवीन जोश शिरला नसता तरच नवल. मुलींची पोवाडा पथके, ढोल पथके, घोषणा देणाऱ्या शेकडो मुली अशा माहोलमध्ये आपल्या rotaractors नी सादर केलेले पथनाट्य मुलीनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आपल्या क्लबचा आणि कर्वे पुतळ्यापाशी आपण केलेल्या कार्यक्रमाचा आवर्जून उल्लेख व्यासपीठावरून करण्यात आला. शानिवारवाड्यावरील कार्यक्रमानंतर पद यात्रेला सुरुवात झाली. हातात फलक घेऊन आणि घोषणा देत ४-५ किमीचे अंतर कधी संपले ते कळलंच नाही. फुले वाड्याजवळ आमची पद यात्रा मुख्य पद यात्रेला भेटल्यानंतर आम्ही पद यात्रेचा निरोप घेतला. एक अतिशय वेगळा अनुभव आम्ही घेतला आणि या प्रश्नासाठी विविध मार्गांनी काम करण्याचा आमचा निर्धार पक्का झाला. आपल्या या उपक्रमाला वरुणराजाचाही मनापासून पाठिंबा मिळाला. दिवसभर कोसळण्याचा पावसाचा इरादा असूनही बरोबर १० ते २ या वेळात त्याने विश्रांती घेतली. शिवाय आपल्या सदस्यांनी मदतीचा आणि उत्साहाचा वर्षाव केल्यानी हा उपक्रम यशस्वी झाला. तेव्हा सर्वांचे मनापासून आभार.

Project Details

Start Date 28-08-2011
End Date 28-08-2011
Project Cost 0
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 0
Partner Clubs Rotaract Club of Pune Gandhi Bhavan
Non Rotary Partners Yashawantrao Chavan Pratishthan Mumbai
Project Category -